कर्जबाजारीपणाला कंटाळून तरूणाची गळफास घेवून आत्महत्या
रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास उघडकीस आली. प्रमोद कृष्णा आंब्रे (४२, रा. मिरजोळे एमआयडीस) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.
प्रमोद आंब्रे यांचा भाजीचा व्यवसाय होता. व्यवसायात तोटा झाल्याने प्रमोद हे कर्जबाजारी झाले होते. यातून आलेल्या नैराश्यातून प्रमोद यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रमोद यांचा मृतदेह फणसवळे येथील जंगलमय भागात झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत स्थानिकांना आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आला.
www.konkantoday.com