सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी आमदार सदा सरवणकर नियुक्ती

0
34

मुंबई : मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेता आदेश बांदेकर यांच्याकडे या पदाची सूत्रे गेल्या अनेक वर्षांपासून होती. परंतु, आता मंदिर न्यायासचे अध्यक्षपद सदा सरवणकरांकडे गेले दरम्यान, याबाबत सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मी स्वतःला भाग्यवान समजतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करून सिद्धिविनायकसारख्या पवित्र संस्थेची जबाबदारी सोपवली. गेली अनेक वर्ष मंदिर परिसरात अनेक गणेश भक्तांच्या अडचणी पाहिल्या आहेत. त्यामुळे आता मला गणेश भक्तांसाठी बरंच काम करता येईल” , असं सदा सरवणकर म्हणाले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here