महिला लोकशाही दिन 20 नोव्हेंबर रोजी
रत्नागिरी, दि. 7 : जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. माहे नोव्हेंबर 2023 सोमवार 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी अर्जदार महिला स्वत: उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात. त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नाबाबत कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात.
Www.konkantoday.com