
नवीन रेशन कार्डासाठी दहा महिने प्रतिक्षा!
नवीन रेशन कार्ड आणि रेशन कार्डवरील नावे ऑनलाइन होण्यासाठी अर्ज देऊनही विलंब होत आहे. या विलंबामुळे अनेक नागरिकांना रेशनवरील धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. नवीन रेशन कार्डसाठी दहा महिने प्रतिक्षा करावी लागत असल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे मांडली आहे.माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेऊन एक निवेदन सादर केले. त्यामध्ये रेशनकार्ड धारकांची समस्या मांडली. नवीन रेशन कार्ड मिळण्यास दहा महिने प्रतिक्षा करावी लागत आहे. तसेच नवीन नावांची नोंद ऑनलाइन होण्यास विलंब लागत असल्याने अनेकांना रेशन दुकानावरील धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. पीएम किसान सन्मान योजनेचे अर्ज पड़ून असून त्याबाबतची ऑनलाइन कामे ठप्प आहेत.आपल्या कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असल्याची तक्रार परशुराम कदम यांनी मांडली.
www.konkantoday.com