
देवगडच्या कुणकेश्वर समुद्र किनाऱ्यावर रंगला रापण महोत्सव
देवगडच्या कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर रापण महोत्सव आय़ोजित करण्यात आला होता. नागरिकांनी ताज्या मासळीवर ताव मारीत असताना मच्छी जेवण तसेच शाकाहारी प्रदार्थाचा आस्वाद घेत आपला मनमुराद आनंद लुटला.श्री देव कुणकेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करून मान्यवर अतिथी आयोजक यांच्या उपस्थितीत या रापण महोत्सवाची सुरुवात शनिवारी दु.3 वाजता कुणकेश्वर बिच येथे करण्यात आली.
देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था अध्यक्ष प्रमोद नलावडे, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे, माजी ग्राम सरपंच गोविंद घाडी, प्रभारि सरपंच शशिकांत लब्दे, ग्रामसेवक गुणवंत पाटील, देवगड व्यापारी संघ अध्यक्ष शैलेश कदम , कुणकेश्वर, कातवण, रापण संघ, प्रतिनिधी, बचत गट प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत या महोत्सवास सुरुवात झाली.
देवगड तालुका व्यापारी पर्यटन समिती(देवगड), श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत कुणकेश्वर, कुणकेश्वर – कातवण रापण संघ’, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅक यांच्या सहकार्यातून रापण महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले होते
www.konkantoday.com