ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी खासदार संजय राऊत यांनी घेतली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक वर भेट
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मंगळवारी सायंकाळी ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी दाखल झाले.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत हेदेखील आहेत. या दोन नेत्यांमध्ये होत असलेल्या भेटीवर विविध चर्चांना उधाण आले आहे. सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर आज पवार आणि ठाकरे यांच्यात भेट होत असल्याचे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले.
महाविकास आघाडी आणि महायुतीने किती जागा जिंकल्या, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर आगामी निवडणुकीवर महाविकास आघाडीकडून लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या स्थापनेबाबतही चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
www.konkantoday.com