
लालपरीच्या ताफ्यात आता आणखी नवीन बसेस येणार.
सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर करणाऱ्या लालपरीच्या ताफ्यात आता आणखी नवीन बसेस येणार आहेत. राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना वेळेत बस उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नवीन बस खरेदीबरोबरच भाडेतत्वावर गाड्या घेण्यावर भर देत आहे.या धोरणानुसार लवकरच 5 हजारहून अधिक गाड्या एसटीच्या ताफ्यात येणार आहेत. त्यापैकी 1310 गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यासाठी आता निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या शहरांत लालपरी आता नव्या रूपात अवतरेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या 14 हजार बस आहेत. त्यापैकी 350 गाड्या भाडेतत्त्वावरील आहेत.