
खेड शहरातील विविध भागात काही दिवसांपासून सुरू असलेली कमी दाबाची पाणी समस्या आजमितीसही कायम
खेड शहरातील विविध भागात काही दिवसांपासून सुरू असलेली कमी दाबाची पाणी समस्या आजमितीसही कायम आहे. पाणीपुरवठ्यात सुरळीतपणा आणण्यासाठी, नगरप्रशासनाकडून कुठल्याच ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. यामुळे नगर प्रशासनाने लवकरच प्रश्न निकाली न काढल्यास नागरिक हंडा मोर्चा काढण्याच्या पवित्र्यात आहेत.
शहरातील शिवतररोड परिसरात कमी दाबाच्या पाणी समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. टँकरद्वारे विकतचे पाणी पिऊन तहान शमवावी लागत आहे. समर्थनगर परिसरातही पाणी पुरवठ्याचे तीन तेरा वाजले आहेत. सकाळी नळाला पाणी आल्यास सायंकाळी पाणच येत नाही.
www.konkantoday.com