केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली जाणार

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यामार्फत यावेळी प्रथमच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली जाणार आहे. यासाठी आवश्यक पदवीधर मतदार नोंदणी करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना करण्यात आल्या असल्याचे पदवीधर शिक्षक मतदारसंघ प्रदेशाध्यक्ष ज्ञानमित्र पा. घनःश्याम चिरणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पदवीधरांसाठी आवश्यक केंद्र सरकारच्या योजना पुढील कालावधीत येथे राबविल्या जातील असा विश्‍वास प्रदेशाध्यक्ष ज्ञानमित्र प्रि. घनःश्याम चिरणकर यांनी व्यक्त केला. येथील शासकीय विश्रामगृह माळनाका येथे ही पत्रकार परिषद त्यांनी घेतली. जून महिन्यात कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणूक होणार आहे. त्यासाठी तीन टप्प्यात मतदार नोंदणीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. उच्चशिक्षित बहुजन समाज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवाराला विजयी करेल असा विश्‍वास चिरणकर यांनी व्यक्त केला.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button