३८ व्या ज्युनिअर राष्ट्रीय ॲथलेटीक्स स्पर्धेत  रत्नागिरीच्या साक्षी जड्यालने ५००० मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावत महाराष्ट्रासाठी पदकाचे खाते उघडले

0
32

कोइंबतूर, तामिळनाडू येथे आजपासून सुरू झालेल्या ३८ व्या ज्युनिअर राष्ट्रीय ॲथलेटीक्स स्पर्धेत सकाळच्या सत्रात रत्नागिरीच्या साक्षी जड्यालने ५००० मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावत महाराष्ट्रासाठी पदकाचे खाते उघडले.
साक्षीने १६ मी. ५४.३५ सेकंद वेळ नोंदवत दुसऱ्या क्रमांकासह रौप्य पदक जिंकले. उत्तर प्रदेशच्या अंतिमा पालने सुवर्ण पदक मिळवताना १६ मी. ४४.४० सेकंद वेळ नोंदवली.
साक्षीच्या या यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळा कदम, उपाध्यक्ष श्रीकांत पराडकर, सचिव संदीप तावडे यांनी अभिनंदन केले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here