अन्नधान्यांच्या भावात वाढ होत असताना खाद्यतेलाने मात्र सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला

0
35

बहुतांश अन्नधान्यांच्या भावात वाढ होत असताना खाद्यतेलाने मात्र सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. गेल्या दिवाळीच्या तुलनेत सूर्यफूल, पाम, सोयाबीन, सरकी तेलाच्या भावात 30 ते 35 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.शेंगदाणा तेलाचे भाव मात्र टिकून आहेत. गेल्या वर्षी दिवाळीत खाद्यतेलांचे भाव तेजीत होते.
यंदा मात्र परदेशांतून सूर्यफूल, पाम, सोयाबीन तेलाची आवक नियमित सुरू आहे. इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थिती, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला मागणी कमी झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या भावात टप्प्याटप्प्याने घट झाली. या स्थितीमुळे दिवाळीत गृहिणींना दिलासा मिळाला आहे,
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here