
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत फिनोलेक्स इंजिनिअरींग कॉलेज येथे रस्ते सुरक्षा व वाहतूक नियम विषयावर कायदेविषयक प्रशिक्षण शिबिर संपन्न
रत्नागिरी, दि. 20 ) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत फिनोलेक्स इंजिनिअरींग कॉलेज येथे रस्ते सुरक्षा व वाहतूक नियम या विषयावर कायदेविषयक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मोटार वाहन निरीक्षक ऋषीकेश कोराणे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जयंत गुरव व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मोहसिन अवटी हे उपस्थित होते.
यावेळी श्री. कोराणे यांनी चित्रफितीद्वारे विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती दिली तसेच श्री. गुरव यांनी अपघात घडल्यानंतर जखमी लोकांना मदत करण्याबाबत गुड समरेटीयन ची माहिती विद्याथ्र्यांना दिली.
विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी वाहन चालकांनी वाहन चालविताना घ्यावयाची काळजी तसेच सर्व नागरिकांनी रस्त्याचा वापर वाहतूक व्यतिरिक्त इतर कारणासाठी न करण्याचे आवाहन त्यांनी केले. वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने अपघात घडतात त्यामुळे रस्त्याचा वापर अन्य कारणांसाठी न करण्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी काही विद्यार्थ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
000




