
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कापसाळ येथेमोटारीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण जवळ कापसाळ येथे राजलक्ष्मी सॉ मिलसमोर मोटारीच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी अनोळखी चालकाविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हंस राज (५६, मूळ रा. गंगादीन, संत कबीरनगर उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. हंस राज हे राजलक्ष्मी सॉ मिल येथे कामाला होते. रस्त्याच्यापलीकडून नाष्टा करून परत येताना निळ्या रंगाच्या मोटारीची त्यांना धडक बसली. या धडकेत हंस राज गंभीर जखमी झाले. त्यांना त्यांचे मित्र राजेश कुमार व सॉ मिलचे मालक संदीप मोरे यांच्या मदतीने कामथे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com