महाड दुर्घटनेत ३९ तासांचे शाेधकार्य; चार कामगार बेपत्ताच


महाड औद्यागिक क्षेत्रातील ब्ल्यू जेट हेल्थकेअर या औषधनिर्मिती कारखान्यात लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला ५५ तास तर शोधमोहिमेला ३९ तास उलटले तरी बेपत्ता अकरा कामगारांपैकी चार कामगारांचा शोध अद्याप लागलेला नाहीशोधमोहीम सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
येथील औषधनिर्मिती कंपनीमध्ये शुक्रवारी सकाळी दहा वाजता आग लागली होती.

कंपनीत काम करत असलेल्या कामगारांपैकी सात कामगार जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले हाेते. मात्र, अकरा कामगार बेपत्ता होते. या बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे पथक व इतर स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात आली होती. घटनेनंतर सोळा तासांनंतर ही शोधमोहीम सुरू करण्यात आली. बारा तासांच्या प्रयत्नानंतर सात जणांचे जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडले होते. मात्र, ओळख पटली नव्हती. त्यानंतर इतर चार कामगारांचा शोध रविवारी सायंकाळपर्यंत सुरूच होता
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button