
मनोज जरांगेंवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करतेवेळी झालेल्या अपघातात जखमी झालेल्या युवकाचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करीत असताना झालेल्या अपघातातील जखमी तरुणाचा 25 दिवसांनी उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला आहे.गोकुळ कदम याच्या निधनाने मराठा समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. अन्य तीन जणांवर येवल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.येवला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर मनोज जरांगे यांची नऊ ऑक्टोबरला जाहीर सभा होती. जरांगे यांचे आगमन झाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर जेसीबीच्या साह्याने पुष्प उधळण करण्यात येत होती.
यादरम्यान गर्दी झाल्याने जेसीबीच्या ऑपरेटरला अज्ञात व्यक्तीचा धक्का लागला. त्यामुळे जेसीबी मशीनच्या समोरील बकेट खाली झुकली. त्यामुळे बकेटमधून फुले उधळणारे युवक खाली कोसळले होते
.यात चौघेजण गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, यातील गोकुळ रावसाहेब कदम या युवकाचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर २५ दिवसांपासून कोपरगाव येथे उपचार सुरू होते
www.konkantoday.com