
देवरूखच्या राजू काकडे अॅकॅडमीतर्फे शाडूच्या गणेशमूर्ती बनवणार्या कारखाना मालकांचा सत्कार
देवरूख :राजू काकडे हेल्प अॅकॅडमीतर्फे पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती बनवणार्या मालकांचा सत्कार केला जाणार आहे. नुकतीच देवरूखमधील राजू काकडे हेल्प अॅकॅडमीच्या तातडीच्या सभेत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये गणेशोत्सव आगळ्यावेगळ्या पध्दतीने देखील साजरा करण्याचे ठरवण्यात आले. या संकल्पनेत देवरूखातील केवळ शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवणार्या गणपती कारखान्याच्या मालकांचा यथोचित सत्कार करण्याचे ठरवण्यात आले आहे. अॅकॅडमीचे अध्यक्ष गणेश जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम होणार आहेत. या उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक होत आहे.