चिपळुणात अनधिकृत फटाके स्टॉल


कोणतीही परवानगी न घेता अनेकांनी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर रस्त्यांच्या कडेला स्टाल उभारण्यास सुरूवात केली आहे. काहींनी तर फटाक्यांची दुकानेही थाटली आहेत. त्यामुळे शासनाचे परिपत्रक  व नगर परिषदेच्या सूचनांना केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे अतिक्रमणावर कारवाई करणारे प्रशासन अनधिकृत स्टॉलवरही कारवाई करणार का, असा सवाल अन्य व्यावसायिकांकडून उपस्थित होत आहे.
दरवर्षी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात फटाके, आकाशकंदील, चांदण्या व अन्य साहित्य विक्री करणार्‍या दुकानांचा अक्षरशः बाजार असतो. त्यामुळे अनेक दिवस त्याचा परिणाम वाहतूककोंडीवर होत असून वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मात्र तरीही नगरपरिषद पोलीस यंत्रणा संबंधितांवर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. मात्र यावर्षी चित्र थोडे वेगळे आहे. फटाके विक्रीबाबत शासनाने अधिक कडक नियम आणले आहेत. या नियमांचा विचार करता शहरात कोठेही फटाके विक्री करणे शक्य नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी फटाके विक्रेत्यांची बैठक घेवून शहरात कोठेही व्यवसाय करता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. तर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनीही नियम मोडू नका, अशी समज दिली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button