कणकवलीत स्पेअर पार्टचे दुकान खाक; शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा संशय
कणकवली शहरातील मुंबई-गोवा महामार्गालगतच्या प्रांत कार्यालय समोरील श्री गुरुकृपा ऑटो स्पेअर पार्टच्या दुकानाला आग लागली. दुपारी पावणे तीनच्या सुमारास हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आला.त्यानंतर स्थानिकांनी तातडीने आग अटोक्यात आणली. नगरपंचायतीचाही बंब तातडीने दाखल झाला. या घटनेत दुकान व्यावसायिक संजय शिरसाट यांचे दहा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली.
गुरूकृपा स्पेअर पार्ट दुकान व्यावसायिक शिरसाट हे दुपारी दीडच्या सुमारास दुकान बंद करून घरी जेवणासाठी गेले होते. दुपारी पावणे तीनच्या सुमारास बंद दुकानातून धुराचे लोट येत असल्याची बाब स्थानिकांच्या निदर्शनास आली. ही बाब शिरसाट यांना कळविण्यात आली. त्यानंतर दुकानाचे कुलूप तोडून स्थानिकांनी स्पेअर पार्ट व इतर साहित्य बाजूला केले. लगतच्या दुकानांतील आग विझविण्याचे सिलिंडर आणून आग विझवली. काही वेळात नगरपंचायतीचाही अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला होता. मात्र, तत्पूर्वीच स्थानिकांना आग विझविण्यात यश आले. त्यामुळे लगतच्या दुकान गाळ्यापर्यंत आग पसरली नाही.
www.konkantoday.com