राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र महाकाळ यांची रत्नागिरी विधानसभा क्षेत्राध्यक्षपदी निवड
राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र महाकाळ यांची रत्नागिरी विधानसभा क्षेत्राध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने तसेच प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते राजेंद्र महाकाळ यांना रत्नागिरी विधानसभा क्षेत्राध्यक्षपदी नियुक्तीपत्र देण्यात आले.त्यांना शरदचंद्र पवार यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवणे व पक्षसंघटना वाढीचे काम करण्यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. महाकाळ यांचे सामाजिक तसेच शिक्षणक्षेत्रात भरीव काम आहे.
ते एक निष्ठावान व क्रियाशील कार्यकर्ते असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम राजनदादा सुर्वे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघे मिळून एकत्रित उत्तमप्रकारे करतील. त्यांच्या या निवडीनिमित्त आगरनरळ तसेच विभाग व तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या.
www.konkantoday.com