दापोली तालुक्यातील शिरवणे गावच्या कोडजाई नदीच्या ठिकाणी चोरटी वाळू उत्खनन करण्यासाठी पंप सज्ज महसूल खात्याचे दुर्लक्ष कारवाई कोण करणार?
खेड( प्रतिनिधी )
दापोली तालुक्यातील शिरवणे गावचे हद्दीमध्ये कोडजाई नदीच्या ठिकाणी या परिसरातील एका गाव पुढाऱ्या बरोबर ठाणे येथील एका इसमाने चोरटी वाळू उत्खनन करण्यासाठी विनापरवाना सक्शन पंपाच्या माध्यमातून जोरदार वाळू उत्खनना करण्यासाठीच पंप बसवण्यात आला असल्याने दापोली तालुक्यातील शिरवणे परिसरामध्ये खळबळ उडाली असून पर ठिकाणी इथून आलेला हा वाळू व्यवसायका मुळे त्या ठिकाणी असलेली एक वाडीला भीती निर्माण झाली आहे
सक्शन पंपा लावण्यासाठी शासनाची बंदी असताना सदर शिरवणे गावच्या कोडजाई नदीच्या ठिकाणी शासनाची जमिनीमध्ये वाळू उत्खनन करण्यासाठी प्लॉट तयार करण्यात आला आहे या ठिकाणी जोरदार वाळू उत्खनना करण्यासाठी संपूर्ण तयारी झाली असून सदरच्या व्यवसायिकाने वाळू वाहतूक करण्यासाठी दोन बोटीचाही वापर करण्यात येणार आहे सदर दोन बोटी त्या ठिकाणी आणून ठेवल्या गेले आहेत त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ मध्ये संतापाची लाट पसरली आहे
शासनाचे नियम धाब्यावर बसून या चोरटी वाळू उत्खनना करणाऱ्याला कोणाकडून परवानगी मिळाली असा प्रश्न निर्माण झाला आहे या बाबत प्रशासनाने महसूल खात्याने दापोलीचे लोक प्रांत अधिकारी तहसीलदार रत्नागिरी जिल्हा अधिकारी खनिज अधिकारी आणि दखल घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संबंधित या परिसरातून जनतेतून जोरदार होत आहे
www.konkantoday.com