
ड्रग्जविरोधात चिपळूण सिटीझन्स मुव्हमेंट आक्रमक
चिपळूण शहरातील ड्रग्ज रॅकेटवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चिपळूण सिटीझन्स मुव्हमेंटतर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांना बुधवारी निवेदन देवून करण्यात आली. या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, तसेच मान्यवर नागरिक व महिला सहभागी झाले होते. आपण या प्रकरणी लक्ष घातले असून आम्ही कठोर कारवाई करीत आहोत व यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे डीवायएसपींनी सांगितले.
चिपळूण शहरात गेलेल्या काही वर्षामध्ये ड्रग्ज रॅकेट मोठ्या प्रमाणात पसरले आहे व त्याचे गंभीर परिणामही दिसून येत आहेत. असे अंमली पदार्थांचे अड्डे चिपळूण शहरामध्ये अनेक ठिकाणी तयार झालेले आहेत. विशेष करून कॉलेजची व शाळेतील मुलेही या ड्रग्जच्या आहारी गेलेली आहेत. त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. पालकांना या मुलांना आवरणे व त्यांच्यावर नियंत्रण करणे कठीण होवून गेले आहे. अनेक ठिकाी कुटुंबामध्ये काही गंभीर प्रसंगही निर्माण झालेले आहेत. यासाठी आता आपल्याकडून काही ठोस उपाययोजना करणे अपेक्षित आहे. याकरिता चिपळूण सिटीझन्स मुव्हमेंट उभारले आहे. यातूनच ड्रग्ज विरोधी लढा सुरू केलेला आहे. www.konkantoday.com