
खेड शहरातील लॉज वर एका ५१ वर्षीय प्रौढा चा लॉज मधील रूम मध्ये मृतदेह शुक्रवारी आढळून आला
संगलट (खेड)( प्रतिनिधी )
खेड शहरातील स्वागत लॉज वर एका ५१ वर्षीय प्रौढा चा लॉज मधील रूम मध्ये मृतदेह शुक्रवारी आढळून आला या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे अनिल धोंडीराम सोनावणे रा बांद्रा मुंबई असे त्या मृतदेह आढळून आलेल्या प्रौढा चे नाव आहे
स्वागत लॉज मधील रूम मधील राहणारा इसम अनिल सोनावणे याचेकडे विचारपुस तसेच चेक इन/चेक आउट बाबत चौकशी करणेकरीता रुम नं ०३ चे दरवाजाला बाहेरुन ठोकावले असता आतुन कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता तसेच आतुन दुर्गंधी युक्त वास येत होता म्हणुन बाहेरील लाकडी फळीची फट असलेली खिडकी बाहेरुन उघडुन बघीतली असता आतमध्ये असलेले मयत अनिल सोनावणे हे मयत अवस्थेत पालथे स्थितीत पलंगावर पडलेले दिसुन आले
www.konkantoday.com