
देवरूखचे कलाकार विलास रहाटे यांनी साकारले छोट्याशा सुपारीवर बाप्पाचे चित्र
देवरुख येथील तरुण कलाकार विलास रहाटे हे नेहमीच आपल्या कलेत नावीन्यपूर्ण प्रयोग करत असतात.
बाप्पाच्या रेखणीच्या कामातून विसावा मिळाल्यावर विलास यांनी आपल्या कल्पनाशक्तिच्या सहाय्याने बाप्पाची अनोखी सेवा केली आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने एका छोट्याशा सुपारीवर ॲक्रॅलिक कलर च्या साह्याने गणेशाचं चित्र साकारलं आहे.
यापूर्वी ही विलास रहाटे यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठू माऊलीचे रूप तुळशीच्या पानावर साकारले होते. या तुळशीपत्राचे फोटो व विडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
तसेच श्री स्वामी समर्थ व देवीचे चित्र भक्ताच्या मागणीवरून सुपारीवर साकारले होते. चित्रकार, कला मार्गदर्शक, रांगोळी कलाकार अशी ओळख असणारे विलास नेहमीच आपल्या कलेच्या माध्यमातून वेगळेपण साकारण्याचा प्रयत्न करत असतात.
www.konkantoday.com