
रत्नागिरी मारुती मंदिर येथे पाणी योजनेची पाईप लाईन फुटण्याचे सत्र सुरुच
रत्नागिरी मारुती मंदिर येथे पाणी योजनेची पाईप लाईन फुटण्याचे सत्र सुरुच आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजता या ठिकाणी पाईप लाईन पुन्हा फुटली. पाईप लाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून वाया गेले. मारुती मंदिर येथे सतत पाईन फुटून रस्ता खोदाई करावी लागत असल्याने
येथील रस्त्याची देखील दुरवस्था झाली आहे.
रनपच्या नव्या पाणी योजनेचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र दररोज योजनेचे नवे पाईप कुठे ना कुठे फुटून पाण्याची नासाडी होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. शहरातील मारुती मंदिर येथे पाइपलाइन फुटण्याच्या घटना वारंवार होत आहेत.
www.konkantoday.com