
निवडणूक काळात४ ते ६ नोव्हेंबरला संबंधित आचारसंहिता क्षेत्रात मद्यविक्री बंदी राहणार
जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, राजापूर या तालुक्यातील एकूण १४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तसेच मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यातील एकूण १३४ ग्रामपंचायतीमधील १७१ रिक्त सदस्यपदांच्या तसेच ३ थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुका आहेत.५ नोव्हेंबरला मतदान व ६ नोव्हेंबरला निकाल घोषित होणार आहे. त्यामुळे ४ ते ६ नोव्हेंबरला संबंधित आचारसंहिता क्षेत्रात मद्यविक्री बंदी राहणार आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आदेश काढले आहेत.
निवडणुका खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित ग्रामपंचायत आचारसंहिता क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. ज्या ग्रामपंचायत क्षेत्रातील निवडणूक बिनविरोध होईल तिथे हा आदेश लागू होणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून, त्यात कसूर झाल्यास संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
www.konkantoday.com