
त्या मजुराने रत्नागिरी तालुक्यातील रनपार येथे चार दिवस वास्तव्य
रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर बांबवडे तपासणी दरम्यान सापडलेल्या आणि तपासणीनंतर कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झालेल्या त्या मजुराने रत्नागिरी तालुक्यातील रनपार येथे चार दिवस वास्तव्य केले असल्याची माहिती कोल्हापूर येथून उपलब्ध होत आहे. रत्नागिरी तालुक्यातील फिनोलेक्स कंपनी असलेल्या या रनपार परिसरात त्यामुळे पोलिसांनी १३ जणाची वैद्यकीय तपासणी करून त्यांना क्वारंटाइन केले आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली.
www.konkantoday.com