गुहागरात हजारोंचा गांजा जप्त, एकास अटक
गुहागर शहरापासून अवघ्या ३ कि.मी. अंतरावर खुलेआम गांजा विक्री करणार्या एकावर गुहागर पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून तब्बल १ किलो ४०० ग्रॅम गांजा हस्तगत केला. या प्रकरणी एकाला अटक केली असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांना याबाबतची माहिती प्राप्त झाली होती. ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्री आरे नदीवरील पुलाजवळील शैलेश भोसले (४५) याच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये १ किलो ४०० ग्रॅम गांजा सापडला. याची अंदाजे किंमत ४५ हजार रुपये होते. तर या प्रकरणातील शैलेश भोसले याच्यावर एनडीपीएस कलम ८, २० नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
www.konkantoday.com