१५ लाख विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी ॲप, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय


करिअरच्या उंबरठ्यावर असलेल्या नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांची आवड, कल, क्षमता विचारात घेऊन त्यांचे समुपदेशन करणारी, गरज भासल्यास शास्त्रीय कसोट्यांवर आधारित ॲप्टिट्यूड टेस्ट (कलचाचणी) घेऊन त्यांचा शाखा, विषय निवडीचा मार्ग सुकर करण्याची योजना शालेय शिक्षण विभागाने आखली आहे.२०२३-२४ मध्ये परीक्षा देणाऱ्या सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असून करिअर निवडीविषयी गोंधळ असलेल्या निवडक दोन लाख विद्यार्थ्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट घेण्याची योजना आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना विभागाचे प्रशिक्षित समुपदेशक शिक्षक आणि ॲपच्या मदतीने करिअर निवडीबाबत मार्गदर्शन केले जाईल
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button