राज्यातील तब्बल सात लाख ४० हजार १७६ विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याचे उघड
शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी आणि अद्ययावत करण्याबाबत वारंवार सूचना देऊनही राज्यातील तब्बल सात लाख ४० हजार १७६ विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याचे, तर सहा लाख ७० हजार ७२ विद्यार्थ्यांच्या माहितीत विसंगती असल्याचे निदर्शनास आले आहे.विद्यार्थ्यांसाठी गणवेश आणि पाठ्यपुस्तक वाटप शालेय पोषण आहार विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना तसेच शाळांना विद्यार्थी संख्येनुसार अनुदान देण्यात येते. बोगस पटसंख्या रोखण्यासह ‘आधार’नुसार योजनांचे लाभ देण्यासाठी राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड नोंदणी अद्यावतीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शाळांना विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील माहिती स्टुडंट पोर्टलमध्ये नोंदविण्याची सक्ती करण्यात आली आहे.
Wwww.konkantoday.com