मारहाण प्रकरणी तरूणाला दंड, ३ महिने कारावास


संगमेश्‍वर तालुक्यातील तुरळ येथील मारहाण प्रकरणाचा गुन्हा शाबीत झाला असून न्यायाधीशांनी तरूणाला १० हजार रुपये दंड व ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
नथुराम भागोजी भायजे (४३, रा. तुरळ मराठवाडी) असे आरोपीचे नाव आहे. शांताराम भायजे यांच्या बैलाने नथुराम भायजेंच्या पेंढ्यांची १७ ऑक्टोबर २०१९ रोजी नासधुस केली होती. नथुराम भायजेंनी शांताराम भायजे व त्यांच्या पत्नीला मारहाण केली होती. शांताराम भायजेंनी दिलेल्या माहितीनुसार भायजेंवर संगमेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून सुप्रिया वनकर, प्रभारी अधिकारी म्हणून महिला पो. नि. सुरेश गावीत, कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस हवालदार साक्षी कामेरकर यांनी काम पाहिले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button