
चोरवणेतील शाळाबंद आंदोलन मागे
संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे येथे शाळा व्यवस्थापन समिती, पालकांच्या शाळा बंद आंदोलनाला अखेर यश आले आहे. वारंवार रजेवर असणार्या यादव शिक्षकाऐवजी पंचायत समिती शिक्षण विभागाने दुसर्या शिक्षकाची नेमणूक शाळेत केली आहे. यामुळे दोन दिवसानंतर शाळा सुरू झाली आहे.
चोरवणे येथे जि.प.ची पहिली ती सातवीपर्यंत शाळा असून ७२ विद्यार्थी ज्ञानार्जनाचे काम करत आहेत. चार शिक्षक कार्यरत असून यातील यादव नामक शिक्षक आजारी असल्याने वारंवार रजेवर तर कधी दीर्घ रजेवर जातात. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत होते. हा प्रकार शाळा व्यवस्थापन समिती, पालकांनी संगमेश्वर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांच्यासह केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिला होता. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.
अखेर शाळा व्यवस्थापन समिती, पालकांनी आक्रमक भूमिका घेत आपल्या मागणीकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शाळा बंद आंदोलन सुरू केले.
www.konkantoday.com