
चिपळूणात रविवारी ‘सांस्कृतिक वार्तापत्र’ दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा
चिपळूण :: कुटुंब प्रबोधन गतिविधी (उत्तर रत्नागिरी जिल्हा) व सांस्कृतिक वार्तापत्र चिपळूण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. ५) सायंकाळी ५ वाजता चिपळूणातील बेंदरकरआळी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘माधवबाग’ कार्यालयात ‘सांस्कृतिक वार्तापत्र’ दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अंकाचा विषय ‘मी’ला आम्ही करणारं कुटुंब असा आहे. शहरातील डीबीजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांच्याहस्ते अंकाचे प्रकाशन होणार आहे. जिल्हा संघचालक मोहन संसारे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या प्रकाशन सोहोळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन कुटुंब प्रबोधन गतिविधी (उत्तर रत्नागिरी जिल्हा) व सांस्कृतिक वार्तापत्र चिपळूण तालुका यांनी केले आहे.
www.konkantoday.com