
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फोटोग्र्राफी प्रदर्शनाचे आयोजन
रत्नागिरी: जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा फोटो, व्हिडिओ व्यावसायिकांच्या सहकारी संस्थेमार्फत कीडस् फोटोग्राफी प्रदर्शनाचे आयोजन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजक मुकेश गुप्ता यांनी केेले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजय बाष्टे, उपाध्यक्ष साईप्रसाद पिलणकर, सचिव सुबोध भोवड, राजापुरचे छायाचित्रकार चारूदत्त नाखरे यांचेसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या कीडस् प्रदर्शनात छोट्या बालकांचे निरागस भाव व मुड टिपण्यात आले आहेत. हे प्रदर्शन आजपर्यंत पाहण्यासाठी खुले आहे. या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
www.konkantoday.com