कंत्राटी आरोग्य सेविकांनी पुकारले बेमुदत आंदोलन
मुंबईतील आझाद मैदानावर कंत्राटी आरोग्य सेविकांना नियमित रिक्त पदांवर समायोजन करावे, या मागणीसाठी दोन दिवसीय धरणे आंदोलन केले. पण शासनाकडून ठोस असे आश्वासन न मिळाल्याने बुधवारपासून कंत्राटी आरोग्य सेविकांनी बेमुदत कामबंद आंदोलनाला प्रारंभ केला आहे. जिल्ह्यातील १४७ कंत्राटी आरोग्य सेविका या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामध्ये (एनएचएम) गेली अनेक वर्षे कंत्राटी आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी इत्यादी संवर्गातील कंत्राटी पद्धतीने कर्मचारी प्रामाणिकपणे व तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. वारंवार या कर्मचार्यांना मानधन वाढ तसेच कायमस्वरूपी नोकरीचे आश्वासन देण्यात आले. या प्रश्नासंदर्भात सध्या टप्प्याटप्प्याने राज्यभर आंदोलन सुरू आहे. यातील पहिल्या टप्प्यातील आंदोलन गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद कार्यालयासमोर पार पडले. यानंतर आता दुसर्या टप्प्यातील आंदोलन मुंबई येथील आझाद मैदानावर सोमवार व मंगळवार असे दोन दिवसीय पार पडले.
www.konkantoday.com