दारूबंदी सप्ताहामध्ये उत्पादन शुल्ककडून ११३ गुन्हे दाखल
महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून २ ते८ ऑक्टोबरदरम्यान दारूबंदी सप्ताह बाळगण्यात आला. या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई करत ११३ गुन्हे दाखल करण्यात आले. ३ हजार २५७ गावठी दारूसह एकूण १४ लाख ३३ हजार १५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाकडून देण्यात आली.
लोकांनी दारूचे व्यसन टाळावे यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारूबंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. अवैधरित्या दारूविक्री करणार्याविरूद्ध उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान एकूण ११३ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये १०४ वारस तर ९ बेवारस गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. या गुन्ह्यांमध्ये १०२ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
www.konkantoday.com