
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील भर समुद्रात पारंपारीक मच्छीमार आणि पर्ससीन मच्छीमार यांच्यात जोरदार हाणामारी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण-तळाशिल येथील भर समुद्रात रविवारी रात्री पारंपारीक मच्छीमार आणि पर्ससीन मच्छीमार यांच्यात जोरदार हाणामारी झाली. त्यात तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.फ्री स्टाईल हाणामारीनंतर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बोटीवरील खलाशांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि बोटीवरील साहित्य घेऊन गेल्याप्रकरणी तळाशिल येथील 25 जणांवर मालवण पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तळाशील समुद्रात रात्रीच्या अंधारात मच्छीमारांच्या दोन गटात संघर्ष झाल्याची घटना घडली होती. यामध्ये सर्जेकोट येथील कृष्णनाथ तांडेल यांच्या चिन्मय प्रसाद व प्रथमेश लाड यांच्या ‘पीर सुलेमान’ या नौका समुद्रात मासेमारी करत असताना तळाशिल येथील काही मच्छीमारांनी दोन्ही बोटींवर चढत बोटीवरील खलाशांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच बोटीवरील दोन मोबाईल सेट, वायरलेस सेट, दोन जी पी एस संच, दोन फिश फाइंडर, दोन बिनतारी संदेश यंत्रणा, बॅटरी तसेच मासेमारी साहित्य मिळून तीन लाख सत्तेचाळीस हजारांचा मुद्देमाल घेऊन गेले.
www.konkantoday.com