
सर्पदंशाने हर्णै राजवाडी येथील ७१ वर्षीय वृद्धेचा मृत्यू
दापोली तालुक्यातील हर्णै राजवाडी येथे राहणार्या सुनंदा खांबे या ७१ वर्षीय वृद्धेचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ च्या सुमारास घडली.
सुनंदा खांबे या आपल्या राहत्या घराजवळ सकाळी ६.३० च्या सुमारास देवपुजेसाठी फुले काढत होत्या. त्या वेळेला त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटाला विषारी सर्पाचा दंश झाला. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याची खबर दापोली पोलिसांत रविंद्र खांबे यांनी दिली. पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
www.konkantoday.com