मुंबई गोवा महामार्गावरील गुणदे फाटा नजीकखासगी बस चालकाने ठोकर देऊन केलेल्या अपघातात ३६ वर्षीय दुचाकी स्वाराचा मृत्यू
मुंबई गोवा महामार्गावरील गुणदे फाटा नजीक दुचाकी स्वाराला एका खासगी बस चालकाने ठोकर देऊन केलेल्या अपघातात ३६ वर्षीय दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला हा अपघात मंगळवारी सांयकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी खासगी बस चालकावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहेसुदेश केशव गमरे वय ५२, रा. वालोपे ता. चिपळूण असे त्या गुन्हा दाखल झालेल्या बस चालकाचे नाव आहे तर युवराज नारायण धाडवे वय ३६ राहणार. लवेल धाडवेवाडी असे मृत्यू मुखी पडलेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे
मंगळवारी सांयकाळी युवराज नारायण धाडवे गुडलक नेरोलॅक या कंपनी मधून आपली ड्युटी आटोपून दुचाकी नंबर एमएच १२ जे एच ५८९१ या दुचाकीवरुन गुणदेफाटा येथुन लवेल शेलार वाडी या गावाकडे जात असताना गुणदे फाटा येथील दुभाजकावर वळण घेत रस्ता क्राॅस करीत लवेल शेलार वाडीच्या दिशेने जात असताना चिपळूणहुुन खेडच्या दिशेने खासगी बस नंबर एमएच ०८ इ ६१९५ वरील चालकाने दुचाकीला धडक देऊन अपघात केला यामध्ये धाडवे या दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला
www.konkantoday.com