मराठा आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाने रत्नागिरी जिल्ह्यातून लांब पल्ल्याच्या काही फेऱ्या केल्या रद्द
महाराष्ट्रात मराठा आंदोलन तीव्र होत असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राज्य परिवहन महामंडळाने रत्नागिरी जिल्ह्यातून लांब पल्ल्याच्या काही फेऱ्या पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवल्या आहेत.५० फेऱ्या बंद केल्याची माहिती रत्नागिरी विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे दररोजच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.एसटीच्या रत्नागिरी विभागातून कोल्हापूर, पुणे, बीड, लातूर, बेळगाव आदी भागांमध्ये फेऱ्या सोडण्यात येतात; परंतु या फेऱ्या आजपासून बंद करण्यात आल्या आहेत. आंदोलकांनी एसटीवरही दगडफेक, जाळपोळ केल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या फेऱ्या बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. जिल्ह्यातील सुमारे ५० फेऱ्या बंद झाल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले आहेत.
www.konkantoday.com