मराठा आंदोलकांकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या गाडीची तोडफोड
मराठा आंदोलकांकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. गाडीची तोडफोड करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.मुंबई मंत्रालय परिसरात सकाळी सात साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे.हसन मुश्रीम यांची गाडी मंत्रालयाच्या गार्डवन गेटच्या बाजूला आमदार निवासच्या खाली उभी होती. त्यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली. गाडीच्या काचाही फोडल्या. हा हल्ला झाला त्यावेळी पोलीसही तेथे उपस्थित होते. पोलिसांनी तत्काळ त्या आंदोलकांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर मंत्रालय परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या कोल्हापूर निवासस्थानाबाहेरही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
www.konkantoday.com