चिपळुणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाला मिळाली गती
चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरात उभारण्यात येत असलेल्या चिपळुणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामाला आता अधिक गती आली आहे. सध्या काही भागाचे प्लास्टर व सोलिंग, पिचिंगचे काम सुरू आहे. येत्या १५ दिवसात नक्षीदार दगड बसवण्यासह शिवसृष्टीच्या कामाला सुरूवात होणार आहे. यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी १ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. शिवसृष्टीचे काम जे. जे. आर्टस करणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा अशी मागणी नागरिक करीत होते. त्यानुसार हा पुतळा उभारला जात आहे. त्याच्या कामाला यापूर्वीच सुरूवात झाली असून कोट्यावधी रुपये खर्चुन भव्य पुता बसवला जाणार आहे. पुतळा माजी पालकमंत्री रविंद्र वायकर देणार आहेत. हा पुतळा तयारही झाला आहे. त्यामुळे कामे पूर्ण होताच तो येथे आणून बसवला जाणार आहे.
पुतळ्याच्या कामात पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष लक्ष घातले आहे. कामासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे सध्या काही भागात प्लास्टर करण्याचे काम सुरू असून सोलिंग व पिचिंग केले जात आहे. www.konkantoday.com