गुहागरमधून सुटणार्या सुकाई ट्रॅव्हल्स मालकाचे प्रवासी तरूणीशी गैरवर्तन
गुहागरमधून सुटणार्या सुकाई ट्रॅव्हल्समधून प्रवास करणार्या २२ वर्षीय तरूणीजवळ गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ही घटना रविवारी रात्री ८.३० ते १० वाजण्याच्या सुमारास घडली असून त्या तरूणीने विरार पोलीस स्थानकात ट्रॅव्हल्स मालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
सुकाई ट्रॅव्हल्सचा मालक विनायक दणदणे याच्याविरोधात विरार पोलीस स्थानकात भारतीय दंड संहिता १८६० अधिनियम कलम नंबर ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर घडलेला प्रकार हा चिपळूण पोलीस स्थानकाच्या ठाण्याच्या हद्दीत असल्याने तो चिपळूण पोलीस स्थानकात तपासणीसाठी वर्ग केला आहे. या तरूणीच्या वडिलांनी विरार पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिने गुहागर येथून सुकाई ट्रॅव्हल्समधून विरारला जाण्यासाठी प्रवास सुरू केला. ट्रॅव्हल्स चिपळूण बहाद्दूरशेख नाका येथे पोहोचली असता सुकाई ट्रॅव्हल्सचा मालक विनायक दणदणे याने तिच्याशी गैरवर्तन केले. ही बाब क्लिनरच्या निदर्शनास आणून दिली मात्र त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने तिने दणदणे याला ताबडतोब उठा, असे सांगितल्यावर तो बाजूला जावून बसला. दरम्यान तिने विरार येथे घरी गेल्यावर काकांना हकीगत सांगितली. याबाबत वडिलांनी विरार पोलीस स्थानकात दणदणे याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com