यंदा पण रडवणार कांदा, या 6 राज्यात असा वधारला भाव
उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत कांद्याने सध्या खळबळ उडून दिली आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यात तर दक्षिणेतील काही राज्यात काद्यांने 70 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.तर देशातील 6 राज्यांमध्ये कांद्याची किंमत 60 रुपयांच्या पुढे पोहचली आहे. त्यामुळे केंद्र सरकार अलर्टवर आहे. कांदाने यापूर्वी पण देशात रोष वाढला होता. कांद्याने यापूर्वी अनेक राज्य सरकारांना हादरे पण दिले होते. केंद्र सरकारने किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी आता तातडीने उपाय योजना केली आहे. कमी उत्पादन आणि वेळेवर पुरवठा न झाल्याने काद्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे.
,www.konkantoday.com