शिक्षकांनी राजकारणापेक्षा ज्ञानदानाकडे लक्ष द्यावे-पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यात काही शिक्षकांचा पेहराव पाहून राजकारण करणार्या शिक्षकांना पालकमंत्री उदय सामंत यांनी चांगला सल्ला दिला . मी प्रेमाने राजकारण करतो, जर मी पायाने गाठ मारली तर तुम्ही हाताने सोडू शकत नाही. शिक्षकांच्या भूमिकेत राहून राजकारण करण्यापेक्षा ज्ञानदानाकडे लक्ष द्यावे, असे बोलून मंत्री सामंत यांनी शिक्षकांना निर्वाणीचा इशारा दिला.
जिल्ह्यातील मानधन तत्वावर काम करणार्या शिक्षकांचा मेळावा रविवारी मराठा भवन येथे पार पडला. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना या संघटनेच्या माध्यमातून आयोजित या मेळाव्याला मंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती लावली. ज्यावेळी जिल्ह्यासाठी शेकडो शिक्षकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी सामंत यांनी शिक्षकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांना मार्गदर्शन केले. जितके दिवस मानधन तत्वावर काम कराल त्या शिक्षकांच्या नियमित मानधन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द सामंत यांनी दिला. शिक्षकांना ९ हजार रुपये मानधन देणारा महाराष्ट्रामधील रत्नागिरी जिल्हा हा एकमेव जिल्हा असल्याचे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com