वंदे भारत उद्यापासून शुक्रवार वगळता ६ दिवस धावणार


कोकणवासियांच्या सर्वाधिक पसंतीस उतरलेली आलिशान मुंबई-मडगांव वंदे  भारत एक्स्प्रेस १ नोव्हेंबरपासून आठवड्यातील शुक्रवार वगळता ६ दिवस नियमितपणे धावणार आहे. ३१ ऑक्टोबरपासून वंदे भारत एक्स्प्रेसचा वेगही मंदावणार आहे.
प्रवास आता १० तासांवरून अवघ्या ७ तास ४५ मिनिटांवर येणार आहे. दीपावली सुट्ट्या हंगामासह सलग सुट्ट्यांमुळे कोकण मार्गावरून धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस हाऊसफुल्ल धावणार आहे.
२८ जूनपासून ८ डब्यांची सुपरफास्ट सीएसएमटी मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस कोकण मार्गावर सोमवार, बुधवार, शुक्रवार तर परतीच्या प्रवासात मंगळवार, बुधवार, शनिवारी धावत आहे.
आठवड्यातील ६  दिवस धावणार आहे. १ नोव्हेंबरपासून २२२२९ क्रमांकाची सीएसएमटी मुंबई-मडगांव वंदे  भारत एक्स्प्रेस सकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी सुटून दुपारी १ वाजून १० मिनिटांनी मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात २२२३० क्रमांकाची मडगाव-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस मडगांव येथून दुपारी २.४० वाजता सुटून रात्री १०.२५ वाजता सीएसएमटी मुंबई स्थानकात पोहचेल. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button