मुद्रांक विक्रेत्यांच्या एकदिवशीय संपामुळे नागरिकांचे हाल
राज्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी सोमवारी एकदिवसीय संप केला. त्यामध्ये रत्नागिरीतील मुद्रांक शुल्क विक्रेतेही सहभागी झाल्यामुळे नागरिक व महसूल विभागातील व्यवहारांवर परिणाम झाला. राज्यातील साडेतीन हजार मुद्रांक शुल्क विक्रेते संपात सहभागी झाल्याने सर्वसामान्यांचे हाल झाले. महसूल खात्याचे सर्व व्यवहार सोमवारी ठप्प झाले होते. त्यामुळे स्टॅम्प मिळत नसल्याने या दिवशी अनेक दैनंदिन व्यवहार खोळंबले. ५०० व १०० चे मुद्रांक बंद करू नये या प्र्रमुख मागणीसाठी मुद्रांक विक्रेते संपावर गेले होते. www.konkantoday.com