
माजी खासदार निलेश राणे व उद्योग मंत्री उदय सामंत व लोकसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार किरण सामंत यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
माजी खासदार निलेश राणे व उद्योग मंत्री उदय सामंत व लोकसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार किरण सामंत यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे
माजी खासदार निलेश राणे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची नुकतीच भेट घेतली आहे. यावेळी किरण सामंत हे देखील उपस्थित होते. त्यामुळे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात राजकिय चर्चांना उधाण आलंय. मात्र ही भेट कोकणाच्या विकासासाठी असल्याचं सांगितलं जातंय. बंद दाराआड तासभर ही चर्चा झाल्याची माहीती मिळतेय. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार असणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी वारंवार बोलून दाखवले आहे या मतदारसंघातून त्यांचे बंधू उद्योगपती किरण सामंत हे इच्छुक आहेत या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार उभा राहणार असल्याचे भाजप नेत्यांकडून जाहीर केले जात आहेत तर निलेश राणे हे आमदारकीसाठी इच्छुक असल्याचे कळतंय त्यामुळे सध्या तरी या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे
www.konkantoday.com