माकडांमुळे होणार्या उपद्रवाला आळा घालण्यासंदर्भातवानरांच्या बंदोबस्तासाठी पर्यायांची चाचपणी
काही दिवसांपूर्वी वानर माकडांमुळे होणार्या उपद्रवाला आळा घालण्यासंदर्भात अविनाश काळे यांनी भैय्या सामंत यांच्याशी चर्चा केली. यावेळी वानरांच्या बंदोबस्तासाठी विविध पर्यायांची चाचपणी करण्यात आली. वानर माकड उपद्रवाबाबत शासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाकडे दिलेला आहे. त्यात मारण्याची परवानगी हा उपाय तसेच नुकसान भरपाईमधील नवीन तरतुदी सुचवलेल्या आहेत. त्या अहवालाची अंमलबजावणी हिवाळी विधानसभा अधिवेशनामध्ये करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी काळे यांनी तात्पुरत्या स्वरूपातील उपायांबाबत वानर माकडे पकडून नेण्याकरता जिल्हा वनअधिकारी खाडे यांच्याशी बोलून तातडीने वानर माकडे पकडणार्या माणसांना बोलावून त्यांचे प्रात्यक्षिक घेण्यासाठी सुचविले. सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे यांचे समाधान झाले तर रत्नागिरीतील जिल्ह्यातील वानर माकड पकडण्यासाठी ऑर्डर काढायची आणि त्यासाठी लागणारा निधी शासनस्तरावर पालकमंत्री वनखात्याच्या योजनेतून किंवा जिल्हा नियोजनमधून उपलब्ध करून देतील असे वनअधिकारी खाडे यांना सांगितले. www.konkantoday.com