
बंगळूर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या खूनप्रकरणी बंगळूर येथे गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने पाचवा संशयित आरोपीला केली अटक
बंगळूर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या खूनप्रकरणी बंगळूर येथे गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने पाचवा संशयित आरोपी के. एन. वर्धन (20, रा.चिंकबल्लापूर, कर्नाटक, बंगळूर) याला गजाआड केले.
डॉ. रेड्डी यांचा खून के. एन. वर्धन, मधुसुदन तोकला आणि पी. बी. मन्नू या तिघांनी केला होता. या तिघांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आतापर्यंत या खूनप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, या गुन्ह्याशी संबंधित अद्यापही चार संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत.
पाचवा आरोपी के. एन. वर्धन याला कणकवली पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याला 10 नोव्हेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे, तर यापूर्वी पोलिस कोठडीत असलेले मधुसुदन तोकला, सुभाष सुब्बा रायाप्पा एस. आणि पी.बी.मन्नू या चौघांची पोलिस कोठडी मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. डॉ. रेड्डी यांच्या खून प्रकरणामध्ये मधुसुदन तोकला हाच मुख्य आरोपी आहे, हे सिद्ध झाले आहे. मयत डॉ. रेड्डी यांचे डेंटल मेडिकल कॉलेजसह बंगळूरमध्ये अनेक व्यवसाय आहेत. मधुसुदन आणि डॉ. रेड्डी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून व्यावसायिक संबंध आहेत. व्यवसायासाठी लागणारी आर्थिक मदत डॉ. रेड्डी यांना मधुसुदन यांनी केली होती. त्यामुळे त्या व्यावसायिक वादातूनच मधुसुदन याने डॉ. रेड्डी यांना संपवण्याचा निर्णय घेतला, असेही तपासात पुढे येत आहे.डॉ.श्रीनिवास रेड्डी यांच्यासह तिघांवर बंगळूर येथील एका प्रकरणात आरोपींपैकी दोघांवर गुन्हा दाखल असून पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ते राज्याबाहेर आले. गोवा येथेही ते थांबले होते. त्यानंतर सिंधुदुर्गात येवून डॉ.रेड्डी यांचा मधुसुदन, के.एन.वर्धन आणि पी.बी.मन्नू यांनी खून केला.
खूनात वापरलेला चाकू घटनास्थळावरून हस्तगत
डॉ.रेड्डी यांचा खून कारमध्येच चाकूने वार करुन करण्यात आला. त्यानंतर त्यांचा मृतदेह साळिस्ते येथे महामार्गानजीक टाकण्यात आला. त्यानंतर त्याच कारने आरोपी तिलारी येथे गेले आणि कार सोडून पसार झाले होते




