
भोके-फणसवळे नदीच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेत अनोळखी मृतदेह आढळला
रत्नागिरी तालुक्यातील भोके-फणसवळे नदीच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेत अनोळखी मृतदेह आढळला. ही घटना रविवारी सायंकाळी ४ च्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली असून मृताची ओळख पटण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. रविवारी सायंकाळी स्थानिक ग्रामस्थ सुरेश शिंदे यांनी नदीच्या पात्रामध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची खबर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी येथे जावून पाहणी केली असता अंदाजे ४५ वर्षीय पुरूषाचा मृतदेह असल्याचे दिसले या बाबत ग्रामस्थांशी चौकशी केली असता या मृतदेहाची ओळख नसल्याचे सांगण्यात आले.
www.konkantoday.com